श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ उत्साहात

 

श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, संघटन प्रमुख व सचिव श्री शांतारामजी कळसकर साहेब यांचा सत्कार कन्हैया तर्फे ट्रस्टच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमासाठी डॉक्टर व उद्योगपती बाळासाहेब सालके, श्री ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, पारनेर तालुका पत्रकार संघाचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार दत्ताजी जयसिंग हरेल सुपेकर सर यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. तसेच धार्मिक क्षेत्रातील हरिभक्त परायण तनपुरे महाराज यांचीही उपस्थिती लाभली.

सत्कार प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांचा मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सत्काराच्या निमित्ताने ग्रामीण विकासाच्या कामांना अधिक गती देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

समारोपाच्या प्रसंगी सल्लागार श्री रुपेजी ढवणयांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.


0/Post a Comment/Comments

Translate