अहिल्यानगर शहर व नेवासा परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 13 जिवंत गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून 200 किलो गोमांस आणि लोखंडी सुरा असा एकूण 2 लाख 5 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या व्यक्तींची माहिती गोळा करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक दिपक मेढे व अंमलदार सुनिल पवार, शाहिद शेख, विष्णु भागवत, अतुल लोटके, गणेश धोत्रे, दिपक घाटकर, पंकज व्यवहारे, सोमनाथ झांबरे, भाऊसाहेब काळे, सागर ससाणे, सतिष भवर, चालक भगवान धुळे आणि उमाकांत गावडे यांचे दोन पथक तयार करण्यात आले.
या पथकांनी 11 ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर शहर व नेवासा येथे सखोल माहिती काढून संयुक्तपणे छापे टाकले.
अहिल्यानगर कोतवाली पोलीस ठाण्यातील कारवाईत
आरोपी इरफान फारुक कुरेशी (वय 34) आणि शकील बाबासाहेब कुरेशी (वय 35, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट, अहिल्यानगर) यांच्याकडून 200 किलो गोमांस आणि लोखंडी सुरा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गु.र.नं. 923/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 271, 325 आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5(अ)(ब)(क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासा पोलीस ठाण्यातील कारवाईत
आरोपी मुजाहिद अमिर शेख आणि मोहसिन शब्बीर शेख (दोघे रा. सलाबतपूर, ता. नेवासा) यांच्या ताब्यातून 13 जिवंत गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. या संदर्भात गु.र.नं. 883/2025 अंतर्गत महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5(अ)(ब), 9 आणि प्राण्यांना निर्धयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 9, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 2 लाख 5 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने यशस्वीपणे पूर्ण केली असून जिल्ह्यात गोवंशीय कत्तल प्रकरणांवर कठोर कारवाई सुरूच राहील, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा