"संविधानाची पंचाहत्तरी" सोहळ्याने नेवासा गाजला!

नेवासा – भारतीय संविधान हा भारताचा आत्मा आहे, असे प्रतिपादन प्रा. अजय पाटील यांनी केले. अनुलोम संस्था, समर्पण फाऊंडेशन, श्री ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा व सौ. सुंदरबाई गांधी कन्या विद्यालय, नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने “आपल्या संविधानाची पंचाहत्तरी” हा कार्यक्रम दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी ज्ञानोदय इंग्लिश स्कुल नेवासा व सौ. सुंदरबाई गांधी कन्या विद्यालयाच्या परिसरात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्पण फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. करणसिंह घुले होते, तर प्रमुख वक्ते म्हणून ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख ज्येष्ठ प्रा.डाॅ. अजय पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रसंगी प्राचार्य रावसाहेब चौधरी, प्राचार्या सौ. सुरेखा पारखे, सुमित पटारे, अनुलोम या संस्थेचे श्री. अविनाश गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


प्रा. डॉ.अजय पाटील यांनी आपल्या प्रभावी आणि ओघवत्या शैलीत केलेल्या भाषणात “संविधान व संविधानाची पंचाहत्तरी” या विषयावर सखोल विवेचन केले. भारताचे नागरिक व संविधान यांचा संबंध, संविधानाच्या रचनेत लागलेला कालावधी, त्यातील मुलभुत अधिकार, कर्तव्ये, संविधान व त्यातील तत्वे याचे त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण केले. ७५ वर्षांत देशाच्या प्रगतीबरोबरच आलेल्या आव्हानांचा उल्लेख करुन भ्रष्टाचार, जातीयवाद, दहशतवाद यावर नियंत्रणासाठी संविधानाचे पालन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. करणसिंह घुले म्हणाले की, “स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होऊनही अजून काही उद्दिष्टे पूर्ण झालेली नाहीत. समाजाची संविधानाबाबतची जागरूकता वाढवणे हे समर्पण फाऊंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संविधान प्रत्येकाने समजुन घेतल्याशिवाय आदर्श समाज घडणार नाही.”

यावेळी सूत्रसंचालन श्री आखाडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रोशन सरोदे सर यांनी केले.

या कार्यक्रमाला ज्ञानोदय इंग्लिश स्कुलचे प्राचार्य रावसाहेब चौधरी सर, पर्यवेक्षिका दिघे मॅडम, सुंदरबाई गांधी कन्या विद्यालयाच्या प्राचार्या पारखे मॅडम, बनकर सर, आखाडे सर, धस सर, ढेरे सर, सुधीर बोरकर सर आदी उपस्थित होते.



0/Post a Comment/Comments

Translate