अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा खुर्द येथे येत्या रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता मोहिनीराज मंगल कार्यालय (पाक शाळा) येथे परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग ध्यान साधना, कुंडलिनी जागृती आणि आत्मसाक्षात्काराचा भव्य सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सहजयोग परिवार, नेवासा तालुका व अहिल्यानगर जिल्हा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले असून संपूर्ण तालुक्यातील सर्व साधक, उपासक आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या दिवशी सायंकाळी ठीक पाच वाजता श्री माताजी निर्मला देवी यांच्या चैतन्य रथाची भव्य शोभायात्रा नेवासा खुर्द गावातून काढण्यात येईल. शोभायात्रेची सांगता मोहिनीराज मंगल कार्यालयात होणार असून त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता मुख्य कार्यक्रमास सुरुवात होईल.
सहजयोग ध्यान साधना ही पूर्णतः विनामूल्य असून जगभरातील ८५ हून अधिक देशांमध्ये ही साधना यशस्वीपणे राबवली जात आहे. सहजयोग ध्यानाद्वारे आत्मशांती, आनंद, समाधान, आरोग्य आणि जीवनातील समस्यांचे निराकरण साधता येते, असे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री नानासाहेब कोकणे, अंकुश गायकवाड, लक्ष्मण दाणे, अशोक ढोले, सुभाष हंडाळ, कैलास एरंडे व सहजयोग परिवारातील अनेक साधक कार्यरत आहेत. सर्व ग्रामस्थांनी आणि परिसरातील भक्तांनी या आध्यात्मिक सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा