आता लढा मनमाड मार्गावरील वळवलेली वाहतूक बंद करण्यासाठी. नागरिकांच्या प्रश्नासाठी काँग्रेसने सदैव आक्रमक भूमिका घेत प्रश्नांची सोडवणूक केली आहे. महामार्गाचे काम सुरु झाल्याने समाधान वाटले परंतु आता लढा मनमाड महामार्गाची वाहतूक अहिल्यानगर - संभाजीनगर महार्गांवर वळविली आहे ती बंद करण्यासाठी. लवकरच यासाठी रास्ता रोको करून ही वाहतुक बंद करणार - संभाजी माळवदे, प्रदेश काँग्रेस कमिटी.
प्रशासनाला नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार नाही. काँग्रेसने घेतलेली भूमिका ही योग्य असून तिचे आम्ही स्वागत करतो मनमाड महामार्गाची वळवेलेली वाहतूक बंद करण्यासाठी मैदानात उतरणार - रावसाहेब काळे, अध्यक्ष छावा संघटना.अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गाची खड्डे पडून झालेली दुरावस्था, खड्ड्यामुळे महामार्गाची अक्षरशः झालेली चाळण, प्रशासनाचे दुर्लक्ष याविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक लढा देत जागतिक बॅंकेच्या कार्यकारी अभियंताच्या कार्यालयास टाळे ठोकत धरणे आंदोलन करत तातडीने महामार्ग दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. काँग्रेसच्या आक्रमक आंदोलनाच्या लढ्यास आज यश मिळाले आहे. अहिल्यानगर- संभाजीनगर महामार्गाची खडी व डांबरीकरणाने खड्डे बुजवून दुरुस्ती सुरु करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्यासाठी तब्बल तीन कोटीची निविदा काढून वर्क ऑर्डर देखील काढण्यात आल्या असून अहिल्यानगर ते इमामपूर, इमामपूर ते घोडेगाव, घोडेगाव ते वडाळा अशा तीन टप्प्यात महामार्गाच्या दुरुस्ती कामास सुरुवात देखील करण्यात आली.
कामास प्रारंभ केल्यानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संभाजी माळवदे तसेच काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः दुरुस्ती कामाची पाहणी केली यावेळी कामाची गुणवत्ता राखण्याबरोबरच दुरुस्ती काम जोरात करण्यासाठी तीन युनिटमध्ये वाढ करून पाच युनिटद्वारे काम सुरु करावे व दीपावली पूर्वी पूर्ण खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी उपभियंता यांच्याकडे करण्यात आली. यामुळे महामार्गाचे लवकरात लवकर काम पूर्ण होण्यास मदत होणार असून प्रवासी नागरिकांना खड्यामुळे होणारा मानसिक त्रास कमी होणार आहे तसेच अपघाताचे प्रमाण देखील कमी होईल. याशिवाय प्रवासाला कमी वेळ लागेल. तर दिवाळी सुट्टीमध्ये प्रवाशांचे होणारे हाल थांबतील.यामुळे या महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. काँग्रेसच्या भूमिकेचे जिल्ह्याभरातून नागरिकांनी स्वागत केले आहे.यावेळी छावाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे, काँग्रेस शहराध्यक्ष अंजुम पटेल, बसपाचे युवा नेते हरीश चक्रनारायण,काँग्रेसचे संदीप मोटे, आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा