फटाकेमुक्त शपथ व विविध उपक्रमांनी जि.प.प्राथमिक शाळा नेवासा खुर्द मुले शाळेत दिवाळी साजरी.

सर्व सणाचा राजा म्हणून सर्वात त मोठा सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी म्हणजेच दिव्याचा सण..प्रत्येकाचे जीवन दीपा प्रमाणे प्रकाशाने उजळून टाकणारा.. आनंदाचा ,उत्साहाचा ,रोशनाईचा सण होय. 

आज जि.प.प्राथमिक शाळा-नेवासा मुले शाळेत पर्यावरण पूरक विविध उपक्रमानी दिवाळी चिमुकल्यांनी साजरी केली. किल्ला बनवणे,

आकाश कंदिल बनवणे ,ग्रेंटिग कार्ड बनवणे,पणती सजवणे अशा कार्यशाळा शाळेत घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना फराळ म्हणून खमंग स्वादिष्ट रुचकर चिवडा बनवून वाटण्यात आला.

फटाकेमुक्त शपथ घेऊन प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करु या .ध्वनिप्रदूषण व वायूप्रदूषण फटाक्यामुळे कसे वाढते? याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक असिफ शेख यांनी केले.तसेच नेवासा खु केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी सर्व चिमुकल्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.सर्व वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक फराळ म्हणून दिवाळी सुट्टीअभ्यास अंक सुफूर्त केला.

फुलांनी काढलेली रांगोळी,मुलांनी केलेला दिव्याचा आकार,पणतीत प्रज्वलित केलेले दिवे,रांगोळीतले संदेश,विविधरंगी आकाशकंदील ,ग्रेंटिग कार्ड,व रुचकर चिवडा आजच्या कार्यक्रमाचे विशेष ठरले.चिवडा बनवण्यासाठी अण्णासाहेब शिंदे व साईनाथ वडते यांचे सहकार्य लाभले. 

हा कार्यक्रम नेवासा खुर्द केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय संजय शेळके व जिल्हा परिषद प्राथमिक नेवासा मुले शाळेचे आदरणीय असिफ शेख यांच्या मार्गदर्शनाने पार पडला.

कार्यक्रम यशस्वीते साठी कामिनी बायस ,संध्या लोंढे,सुनिता कर्जुले-राऊत,अश्विनी मोरे,विद्या खामकर ,मीनाक्षी लोळगे,ज्योती गाडेकर,प्रतिभा गाडेकर , अर्चना बोकारे ,साईनाथ वडते ,अण्णासाहेब शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले.



0/Post a Comment/Comments

Translate