पारनेर: पारनेर तालुक्यातील क्रांती शुगर कारखाना दरवर्षी दिवाळीच्या काळात सभासदांना साखर वाटप करतो. मात्र यंदा दिवाळी अगदी जवळ आली असतानाही साखर वाटप न झाल्याने सभासदांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
सभासदांचे म्हणणे आहे की केवळ साखरेचेच नव्हे तर पेमेंटचेही वाटप झालेले नाही. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना अद्याप कोणतीही हालचाल न झाल्याने सभासदांमध्ये असंतोष वाढला आहे.
त्यांनी कारखाना प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन साखर वाटप तसेच गेल्या वर्षीचा दुसरा हप्ता सभासदांना देण्याची मागणी केली आहे. कारखान्याने वेळेत निर्णय न घेतल्यास सभासदांमध्ये रोष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा