जामखेड (प्रतिनिधी) : नगर आणि पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध वास्तुविशारद श्रीमान वसंतराव वांढेकर यांचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्य सरकारच्या उच्च सेवेत कार्यरत असलेले उपायुक्त चि. गौरव वांढेकर आणि जामखेड तालुक्यातील प्रतिष्ठित राजकीय नेते, उद्योजक तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमान मधुकरराव राळेभात यांची उच्च शिक्षित कन्या चि. सौ. कां. कावेरी यांचा साखरपुडा समारंभ रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.५५ वाजता जामखेड येथील राज लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
या प्रसंगी दोन्ही परिवारातील नातेवाईक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यामुळे वांढेकर आणि राळेभात परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा