विना सैनिकांचा सेनापती… नेवासा नगरपंचायतीत अनोखी राजकीय गोष्ट

 

नेवासा नगरपंचायत निवडणुकीत एक आगळीवेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या एका पक्षाने येथे फक्त नगराध्यक्ष पदासाठी एकच उमेदवार दिला आहे. मजेशीर बाब म्हणजे याच पक्षाकडून एकही नगरसेवक उमेदवार मैदानात नाही.

यामुळे गावभर चर्चा रंगल्या आहेत. लोकांच्या मनात एकच प्रश्न फिरतोय: “सैनिकच नाहीत, तर सेनापती कोणाच्या जोरावर लढणार?”

नगराध्यक्ष जिंकले तरी नगरसेवकच नसताना लोकांची कामे कशी होतील, ठरावांना साथ कोण देईल आणि विकास कसा चालेल, असा लोकांचा सरळ प्रश्न आहे.

याला जोडून आणखी एक मुद्दा चर्चेत आहे. या स्पर्धेत असलेले इतर उमेदवार शिक्षणात आणि जनसमर्थनात या उमेदवारापेक्षा पुढे असल्याचे लोक सांगत आहेत. त्यामुळे या एकाकी उमेदवाराला सामोरं जाणं आणखी कठीण होत चाललं आहे.

दरम्यान, गावात एका नव्या चेहऱ्याची जोरदार चर्चा आहे. लोकांना हा नवा उमेदवार जास्त भावतोय. त्याचे शिक्षण, काम करण्याची पद्धत आणि लोकांमधील विश्वास यामुळे त्याला व्यापक पाठिंबा मिळत आहे. त्याची पार्टीही महाराष्ट्रात मजबूत आहे आणि राज्यात त्यांनी अनेक चांगली कामे केल्याची गावकऱ्यांची मते आहेत. त्यामुळे सर्व स्तरांवरून त्याला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे.



0/Post a Comment/Comments

Translate