“कायद्याचा गैरवापर चालणार नाही” – हरिशदादा चक्रनारायण

(व्हिडिओ मुलाखत)

नेवासा तालुक्यातील मौजे रामडोह येथे काही महिलांकडून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या, खंडणीची मागणी आणि दमदाटी होत असल्याच्या आरोपांमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर 25 पेक्षा अधिक महिलांनी आणि 50 हून अधिक ग्रामस्थांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना लेखी निवेदन दिले.

निवेदनात ग्रामस्थांनी आरोप केला आहे की:-

1. मनीषा शाम परसैय्या उर्फ मनीषा सागर लकारे उर्फ मनीषा शंकर लकारे

2. मीरा शाम परसैय्या

3. गायत्री मनीषा लकारे

या तिघी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून गावातील विविध नागरिकांवर विनाकारण भांडणे करून मोठ्या रकमेची मागणी करतात. पैसे न दिल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते, असा आरोप करण्यात आला आहे. आतापर्यंत दहा ते पंधरा ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल करून खंडणीची मागणी केल्याचेही निवेदनात नमूद आहे. काही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

यामुळे रामडोह गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी सखोल चौकशी करून ज्या ज्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाला राजकीय पाठिंबा मिळाला असून रिपब्लिकन सेना नेवासा शहर अध्यक्ष मा. हरिशदादा चक्रनारायण यांनी ग्रामस्थांना जाहीर समर्थन दिले आहे. त्यांनी मीडियासमोर स्पष्ट शब्दांत सांगितले:


 “गावात भीतीचे वातावरण निर्माण होऊ देणार नाही. कोणताही कायदा हा संरक्षणासाठी आहे, दबाव टाकण्यासाठी नाही. जर कोणी कायद्याचा गैरवापर करत असेल तर त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. -मा. हरिशदादा चक्रनारायण ”

चक्रनारायण यांनी पुढे सांगितले की, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर जर खोटे गुन्हे दाखल झाले असतील तर त्याची निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे. तसेच गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आणि सरपंच यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, पीडितांना न्याय मिळाला नाही तर रिपब्लिकन सेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. प्रशासनाने कर्तव्यात कसूर केल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

निवेदनावर नंदिनी राहुल गंगुले, कोमल घुंगासे, अलका अहिरे, संगीता गंगुले, छाया गंगुले, इंदुबाई गहिरे, सुमनबाई गहिरे, मिनाबाई कुंढारे, मंगलबाई पल्हारे, शोभा पल्हारे, रुक्मिणी कुंढारे, रामकौराबाई गहिरे, सुनिता घुंगासे, राणी गहिरे, रूपाली, नंदा परसैय्या, पारूबाई गव्हाणे, रशीदा पठाण, नीलोफर सलीम पठाण, मीरा रमेश परसैय्या, जयश्री शांतीलाल परसैय्या, सरस्वती तुकाराम परसैय्या, अनिता भगवान गहिरे, मीना नवनाथ गहिरे, नीता संतोष गहिरे आदींसह 25 पेक्षा अधिक महिलांच्या सह्या आहेत.

तसेच सौ. सुनीता संजय घुंगासे व नीता संतोष गहिरे यांनी स्वतंत्रपणे मनीषा सागर लकारे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अन्वये एनसीआर क्र. 266/2026 आणि 267/2026 अंतर्गत कलम 351(2) व 352 नुसार गुन्हे दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, योग्य न्याय न मिळाल्यास पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण करण्यात येईल. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून पुढील घडामो डींकडे सर्वांचे लक्ष आहे.




0/Post a Comment/Comments

Translate