नेवाशात गृहरक्षक दलाचे मोठे योगदान ७९व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम.

 


नेवासे शहर ता.१४ सण, उत्सव तसेच निवडणुकांमध्ये -कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) योगदान मोठे आहे. सद्यस्थितीत अपुरे पोलीस बळ बघता, गृहरक्षक दलाच्या जवानांना पोलीस स्टेशनला नियमित नेमणूक देण्याच्या दृष्टीने शासन पातळीवर प्रयत्न व्हावा, असे प्रतिपादन पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा सचिव दिलीप गायकवाड यांनी केले. 

गृहरक्षक दलाच्या ७९व्या वर्धापन दिनानिमित्त नेवासे तालुका पथकाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पलटणनायक अशोकराव टेमकर हे होते.

यावेळी होमागार्ड कार्यालया समोरा शनिवारी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. व होमागार्ड वर्धापन दिननिमित्त होमागार्ड अधिनियमाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी विकास बोर्डे, राजेंद्र हुशार, बाबासाहेब घोड़ेकर, उमेश इंगळे,

महेश उन्हाळे,महिला होमगार्ड रुक्मिणी सावंत, सुनंदा कवड़े, रंजना रासकर व मनीषा खादे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अल्ताफ शेख यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक दादासाहेब कनगरे यांनी तर सूत्रसंचालन पलटणनायक श्रीकांत ससे यांनी केले. आभार मोहन गायकवाड यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Translate