नेवाशात उपनगराध्यक्ष पदावर अल्पसंख्यांक प्रतिनिधित्वाची मागणी

 


अल्पसंख्यांक समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यास समाजातून आनंदच व्यक्त होईल तसेच अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळेल या माध्यमातून समाजाचा विकास करणे साध्य होईल अल्पसंख्यांक समाजाला संधी देणे हा निर्णय योग्यच राहील - नेवासा काँग्रेस शहराध्यक्ष अंजुम पटेल

नेवासा शहराच्या सर्वांगीण आणि समतोल विकासासाठी उपनगराध्यक्ष पदावर अल्पसंख्यांक समाजातील प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नेवासा शहरातील नागरिकांकडून होत आहे. शहराच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीत अल्पसंख्यांक समाजाचा मोठा वाटा असतानाही निर्णय प्रक्रियेत त्यांचे प्रतिनिधित्व अपेक्षित प्रमाणात नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मागील निवडणुकीत अल्पसंख्यांक समाजाने क्रांतिकारी शेतकरी पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान करून विश्वास दर्शविला होता. त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांचे आहे. उपनगराध्यक्ष पद अल्पसंख्यांक समाजाला दिल्यास शहरातील विविध घटकांचा सहभाग वाढेल आणि विकासकामांना गती मिळेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांबाबत अनेक प्रश्न प्रलंबित असून, या प्रश्नांवर सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम होणे गरजेचे असल्याचेही नागरिकांनी नमूद केले. निर्णय प्रक्रियेत सर्वांचा आवाज पोहोचावा, यासाठी समावेशक नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.

या मागणीमुळे नेवासा शहराच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Translate