कथित सावकारीचा मुद्दा तापला: अंबादास लोखंडे यांनी सादर केली कागदपत्रे

सविस्तर माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ बघा

 नेवासा : तालुक्यातील कथित सावकारीचा मुद्दा चांगलाच तापला असून संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कमी उत्पन्न गटातील नागरिकांना जास्त व्याजदराने पैसे उधार देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

कथित सावकारांकडून कर्जाच्या मोबदल्यात धनादेश, हमीपत्रे तसेच बँकेचे चेक घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे. वेळेत व्याज न भरल्यास मानसिक त्रास, दमदाटी व सामाजिक दबाव टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकारामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत.

या प्रकरणी पीडित नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाकडे संबंधित कथित सावकारांवर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसांनी तातडीने चौकशी करून दोर्षीवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कथित सावकारीच्या वाढत्या प्रकारांमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक व मानसिक स्वास्थ्य धोक्यात येत असून शासनाने अशा बेकायदेशीर व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

या ज्वलंत विषयावर अंबादास लोखंडे यांनी सूर्यकर यांच्या कथित सावकारी व्यवहाराबाबत माहिती सादर केली. पावेळी सूर्यकर यांच्याशी संबंधित बैंक स्टेटमेंट तसेच न्यायालयात सूर्यकर यांनी दिलेले लिखित दस्तावेज उपस्थितांना दाखविण्यात आले. या प्रकरणात काही नागरिकांनी सूर्यकर यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात नॉन-कॉग्निजेबल (NC) तक्रार दाखल केल्याची माहितीही समोर आली आहे. या घडामोडींमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Translate