निघोज येथील सुपुत्र व पत्रकार, समाजसेवक तसेच अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. मुकुंद रामचंद्र निघोजकर यांची ‘लोकसत्ता संघर्ष समाज भूषण पुरस्कार-२०२५’ या सन्मानासाठी निवड झाली आहे. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबरोबरच सामाजिक व अध्यात्मिक कार्याचा विचार करून हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या निवडीचे पत्र नुकतेच ‘लोकसत्ता संघर्ष’चे मुख्य संपादक माननीय श्री. सिद्धनाथजी मेटे, माननीय श्री. प्रकाश साळवे तसेच मार्गदर्शक माननीय श्री. संदीप की. साळवे यांनी प्रदान केले. पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर येथे पार पडणार आहे.
या गौरवामुळे निघोज परिसरातून, तालुक्यातून तसेच इतर जिल्ह्यांतून श्री. निघोजकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मित्र-परिवार, सहकारी व समाजातील मान्यवरांकडून सतत शुभेच्छांचे संदेश व फोन येत आहेत.
या सोहळ्यासाठी श्री. मुकुंद निघोजकर यांनी पत्रकार मित्रांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून, या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा