नेतृत्व म्हणजे केवळ पदावर विराजमान होणे नव्हे, तर ती एक मोठी जबाबदारी असते. समाजकारण करताना व्यापक दृष्टीकोन ठेवून कार्यरत राहिलो तरच समाज, संस्था आणि राष्ट्र घडविण्याचा मार्ग तयार होतो. खुर्चीत बसून आदेश देणे एवढंच काम नसून, केलेल्या कामातून लोकांच्या मनात आदर निर्माण झाला पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सेवेचं व्रत जोपासणारं नेतृत्व म्हणजे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर.
आजच्या समाजात पद, प्रतिष्ठा वा अर्थकारणासाठी प्रचंड रस्सीखेच दिसते. परंतु दाते सरांना मिळालेलं पद हे त्यांच्या दृष्टीने अंतिम ध्येय नसून समाजसेवेचं साधन आहे. जनतेनं त्यांच्या हाती दिलेलं नेतृत्व हे रूबाब मिरवण्यासाठी नव्हे तर जबाबदारी म्हणून त्यांनी स्विकारलं आहे. या जबाबदारीतून प्रत्येकाला प्रेरणा देणं, संकटात मार्गदर्शन करणं आणि समाजातील सर्व घटकांना उंचावर नेणं, हेच त्यांचं ध्येय आहे.
“मला काय मिळालं” याऐवजी “जनतेला काय मिळालं” या दृष्टीकोनातून काम करणं, हा त्यांच्या नेतृत्वाचा खरा गाभा आहे. मतदारसंघातील जनतेच्या भविष्यासाठी स्वप्नं पाहणं आणि त्या स्वप्नांसाठी सर्वांना एकत्र आणण्याचा त्यांचा सततचा प्रयत्न पाहून अनेकजण प्रभावित झाले आहेत.
नेतृत्व कधीच कुणावर लादता येत नाही; ते अंतर्मनातून उगम पावतं. आमदार काशिनाथ दाते सर हे त्याचं जिवंत उदाहरण आहेत. समाजासाठी झटणं, गरजूंना न्याय मिळवून देणं, तरुणांना दिशा देणं, महिलांना स्वाभिमान देणं आणि वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं – हीच त्यांची खरी ओळख आहे.
दाते सर म्हणजे आजच्या राजकारणात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी दीपस्तंभ आहेत. स्वतःच्या कर्तृत्वातून त्यांनी स्वतःची वाट निर्माण केली आहे. गेल्या चाळीस वर्षांच्या समाजकारणातील त्यांच्या प्रवासाने सिद्ध केलं आहे की निर्धार, प्रामाणिकपणा आणि सेवेचं व्रत अंगीकारलं तर विश्वासार्ह नेतृत्व उभं राहू शकतं.
ते परिस्थितीवर रडत बसत नाहीत, दोषारोप टाळतात आणि खोटे दिलासे देत नाहीत. शांतता, संयम आणि विकासात्मक दृष्टीकोन ठेवून ते सातत्याने जनतेच्या सेवेत कार्यरत असतात. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात मूल्यांची स्पष्टता दिसते, म्हणूनच ते आज लोकांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा